आजच्या काळात, कैकाडी समाजातील मुल व मुली बर्यापैकी शिक्षणात अग्रेसर होत आहेत व तसेच खाजगी, सरकारी क्षेत्रात वा व्यवसायात अग्रगनी होत आहेत. कैकाडी समाज हा बहुंताश विखुरलेला आहे त्यामुळे चांगल्या मुलं व मुलींना आपला अनुरूप जोडीदार मिळणे कठीण होत आहे. ही अडचण लक्षात घेऊन कैकाडी समाज वधू वर मंडळाचे आजी-माजी अध्यक्ष - मा. कै. ना. वा. माने, मा. कै. रामजी अप्पा जाधव , मा. श्री. नाथाजी मल्हारी माने व मा. श्री. रघुनाथ गंगराम जाधव या सर्वांच्या कामाची प्रेरणा घेऊन; योग्य वधु-वरास अनुरूप जोडीदार मिळण्यासाठी ऑनलाइन पध्द्दतिचे हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. या व्यासपिठाचा सर्व क्षेत्रातील कैकाडी समाजास अधिकाधिक फायदा होण्याचा हा मानसहेतु होय.
कैकाडी समाज वधु-वर सूचक मंडळ पुणे याची स्थापना होऊन 31 वर्ष झालीत. मा. कै. ना. वा. माने यानी समाजातील योग्य वधु-वरास अनुरूप जोडीदार मिळण्याची गरज लक्षात घेऊन या मंडळाची स्थापना केली. मा. कै. ना. वा. माने यांच्या तदनंतर या मंडळाची वाटचाल यशस्वीपणे पुढे नेण्यात उपरोक्त निर्देशित आजी-माजी अध्यक्ष व संचालक मंडळ समिती यांचे योगाचे मोलदान आहे.
trusted brand